अंबाजोगाई

शेतकरी,व्यापारी,हमाल आणि मापाडी बांधवांना मास्क व सॅनिटायझर वाटप

अंबाजोगाई/ प्रतिनिधी
येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचे वतीने कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शेतकरी,व्यापारी,हमाल आणि मापाडी बांधवांना मंगळवार ( दि. ८) मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.

अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या आवारात विना मास्क येणारे व सॅनिटायझर न वापरणा-या शेतकरी,व्यापारी,हमाल आणि मापाडी बांधवांना मंगळवारी बाजार समितीचे कार्यालयात आमदार संजय दौंड,माजी आ.पृथ्विराज साठे,अंबाजोगाई तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण,अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्यप्रशासक गोविंदराव देशमुख,माजी सभापती अमर देशमुख,शिवसेनेचे तालुकाप्रमुख अर्जुनराव वाघमारे,प्रतिष्ठित व्यापारी प्रकाशचंद सोळंकी,संचालक शेख अब्रार,विलासराव मोरे,दत्ताञय यादव आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.याप्रसंगी कैलास गायकवाड,जावेद शेख,सुधाकर जोगदंड यांचेसह इतरांची उपस्थिती होती.यावेळेस बोलताना आ.संजय दौंड यांनी उपस्थित शेतकरी,व्यापारी, हमाल आणि मापाडी बांधवांना कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर नियमित मास्क व सॅनिटायझर वापरून फिजिकल डिस्टन्सींग ठेवून आपले दैनंदिन कार्य करावे असे आवाहन केले.तर मुख्यप्रशासक गोविंदराव देशमुख यांनी याबाबत सांगितले की,आज अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून व सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क व सॅनिटायझर हे साहित्य वाटप करण्यात आले.तसेच आणखीन ही बाजार समितीच्या आवारात विना मास्क येणारे व सॅनिटायझर न वापरणा-या अशा सुमारे ५ हजार लोकांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात येणार आहे. शेतकरी, शेतमजूर,श्रमिक,कामगार,व्यापारी,हमाल आणि मापाडी बांधवांच्या विविध प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी तसेच समाजातील विविध घटकांना बांधिलकीतून सहकार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मुख्यप्रशासक देशमुख म्हणाले.

जनतेने सहकार्य करावे

जगावर कोरोना या महामारीचे संकट लवकर दूर होईल,अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर,श्रमिक,व्यापारी,हमाल आणि मापाडी तसेच सर्व जनतेने नियमीत मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा,गर्दीत जाणे टाळावे,ञिसुञीचे पालन करावे,समाजातील दानशूर व्यक्ती,संस्था आणि संघटना आदींनी बीड जिल्हा प्रशासन,कोविड रूग्णालय,गरजू कुटूंबिय व व्यक्ती यांना सर्वोतोपरी सहकार्य करावे.

गोविंदराव देशमुख (मुख्यप्रशासक,कृ.उ. बा.स. ,अंबाजोगाई)

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!