केजक्राईम डायरी

गुंगीचे औषध देऊन बोटातील दोन अंगठ्या लांबविल्या

गौतम बचुटे/केज :- केज येथून एका ६६ वर्ष वयाच्या वृद्धाला थंड पेय आणि केळीतून गुंगी येणारे औषध खायला व प्यायला देऊन त्याच्या हाताच्या बोटातील ६० हजाराच्या रु. किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या अज्ञात इसमाने लांबविल्या आहेत.

दि. ५ एप्रिल मंगळवार रोजी केज तालुक्यातील धर्मराज थोरात हे कानडी रोड लगतच्या विजय भन्साळी यांच्या विजय कृषी सेवा केंद्राच्या समोर थांबले असता सकाळी ११:०० ते दुपारी १२:३० चा. च्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने धर्मराज थोरात यांना त्या अनोळखी व्यक्तीच्या मुलीची सोयरीक जुळवायची आहे. अशी बतावणी केली. पाहुणे येई पर्यंत चहापाणी पिण्याचा बहाना केला. थोरात याना तो अनोळखी व्यक्तीने  स्प्राईट या थंड पेयाच्या बाटलीत गुंगी येणारे औषध मिसळून ते प्यायला दिले. तसेच त्यांनी केळी मध्ये पण गुंगी येणारे औषध खायला दिले. नंतर ते दोघे कानडी रोड वरुन क्रांती नगर जवळच्या केजडी नदी मधुन पाटलाचे शेतात गेले. तेथे गेल्या नंतर धर्मराज थोरात यांना गुंगी येताच त्याचा गैरफायदा घेऊन त्या अनोळखी ठगाने धर्मराज थोरात यांच्या उजव्या हाताच्या बोटातील प्रत्येकी दहा ग्रॅम वजनाच्या जुन्या दोन अंगठ्या काढून घेऊन पोबारा केला. धर्मराज थोरात यांना त्यांच्या हातातील दोन अंगठ्या त्या ठगाने फसवणूक करून लुटल्याचे माहीत होताच दि. ८ एप्रिल रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार गु. र. न. १११/२०२२ भा. दं. वि. ३२८ व ३७९ नुसार अज्ञान व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे पुढील तपास तपासी अधिकारी राम यादव हे करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!