केज

चोर्‍या रोखण्यासाठी केज येथे पोलीसांचा व्यापाऱ्यांशी संवाद

गौतम बचुटे/केज:
शहरात होणाऱ्या चोर्‍या व इतर अनुचित प्रकार रोखण्यासाठी केज पोलिसांनी शहरातील व्यापार्‍यांची मंगळवारी ( दि. ८) बैठक घेऊन संवाद साधला. अनुचित प्रकार रोखण्यासाठी यावेळी काय उपाय योजना राबविण्याचे ठरवले.

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशा वरून केज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी शहरातील व्यापाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी बैठक घेतली या बैठकीला पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी, सचिव सुहास चिद्रवार, कार्याध्यक्ष निरंजन लोकरे, कोषाध्यक्ष भूषण भन्साळी, जेष्ठ व्यापारी विजयकुमार भन्साळी, विकास मिरगणे गोविंद कणसे, प्रवीण देशपांडे, सुरेश थोरात, राजाभाऊ घेवारे, अंबादास दमकोंडवार, दादा जमाले, चेतन डुबे, नितीन काळे, हरिओम बारस्कर, मंदार देशपांडे, रुपेश चिद्रवार, दिलीप भुतडा अतुल कुलकर्णी, जालिंदर नेहरकर, प्रा. विठ्ठल आवाड यांच्यासह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत दुकाना समोर संपूर्ण रस्त्यावरील हालचाल दिसेल असे नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे. दुकाना समोरील सम-विषम पार्किंग व्यवस्था करणे. रस्त्याने शाळा व कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींची सुरक्षा घेणे. तसेच पोलीस व नागरिक यांच्यातील संवाद चांगला होण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाचे महत्व पटवून गावोगावी ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्या बाबत चर्चा करण्यात आली.

 

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!