कृषी

कृषि विज्ञान केंद्रात ऊसतोड महिला स्वयंरोजगार मेळावा संपन्न

अंबाजोगाई: दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई, डिघोळआंबा यांच्या माध्यमातून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त ऊसतोड महिला स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. उपेंद्र कुलकर्णी ( प्रकल्प प्रमुख दीनदयाल शोध संस्थान बीड) यांची उपस्थिती होती. औरंगाबाद येथील सामाजिक कार्यकर्त्या संध्या कुलकर्णी, दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे संचालक बिपिन क्षिरसागर, महिला आर्थिक विकास महामंडळ बीड जिल्हा समन्वय अधिकारी सुखदेव चिंचोलीकर, उमेद तालुका समन्वय अधिकारी संजय गायकवाड, इन्फोसिस पुणे यांचे प्रतिनिधी दत्तात्रय पंडित, हेमंत सेलमोहेकर व कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख नरेंद्र जोशी यांची मंचावर उपस्थिती होती.
मेळाव्याचे प्रास्ताविक करताना नरेंद्र जोशी यांनी सांगितले की, बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ऊसतोड माजुरांपर्यंत पोचण्याचे कृषि विज्ञान केंद्राने निश्चित केले आहे. कृषि विज्ञान केंद्राने रचनात्मक कालबद्ध कार्यक्रमाची आखणी केली आहे. ऊसतोड करणाऱ्या महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन बाजरी खारवडी व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे. ऊसतोड महिलांसाठी विविध प्रकारचे व्यवसायांची निवड करण्यात आली आहे. ऊसतोड करणाऱ्या महिला ते स्वयंरोजगार करणाऱ्या महिला हा कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून झालेला बदल त्यांनी सांगितला. पूर्वी ऊसतोड करणाऱ्या महिलांनी प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार माध्यमातून बाजरी खारवडी उत्पादन करण्यास सुरुवात केलेल्या महिलांचा स्वयंउद्योजक म्हणून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गृहविज्ञान शास्त्रज्ञ रोहिणी भराड यांनी केले तर आभार डॉ. रवींद्र कोरके यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी केंद्राच्या परिसरातील ऊसतोड महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!