Uncategorized

जागतिक स्तरावर आयोजित चित्रकला स्पर्धेची बैठक संपन्न

नवी मुंबई:
वेद फाउंडेशन द्वारा, आयोजित “माझे आवडते चित्र” या स्पर्धेच्या नियुक्त समिती सदस्यांची नुकतीच, संस्था मुख्यालयात बैठक संपन्न झाली.

संस्थाध्यक्ष स्वप्नील वाडेकर यांच्या द्वारा, सर्व समिती सदस्यांना नियुक्ती पत्र सोपविण्यात आले. पश्चात सर्व मान्यवरांनी पदभार स्वीकारला. स्पर्धेचे निकर्ष व अपेक्षित निकाल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संस्थेकडे ४ राष्ट्रांतून, २२ शहरातील ३१८ चित्र दाखल झाली असून अजूनही येत आहेत. या चित्रांना व चित्र काढणाऱ्या कलाकारांना योग्य न्याय मिळावा, तसेच त्यांची कला सर्वदूर प्रसिद्ध व्हावी, यासाठी संस्था प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. असे सर्व सदस्याचे एकमत झाले. संस्था सचिव माधुरी कुलकर्णी या विदेशातून दृक्श्राव्य माध्यमाद्वारे, तर उत्तम तरकसे, मंजू सराठे, मंगेश रासम, नम्रता मटकर, विलास देवळेकर, सोनल गांधी या सदर बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित होत्या. पुढील दोन सप्ताहात “माझे आवडते चित्र” या उपक्रमाचे प्रसिद्धी माध्यमाद्वारे निकाल जाहीर करण्यात येतील, असे ठरविण्यात आले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!