बीड

माळी समाजाचा भव्य मेळावा

ना. अजित पवार यांची उपस्थिती

बीड / प्रतिनिधी: संतशिरोमणी सावता महाराज यांचे जन्मगाव श्रीक्षेत्र अरण (जि. सोलापुर) येथे दि.३० एप्रिल रोजी दु.१२.३० वा. सावता परिषदेच्या वतीने माळी समाजाच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून मुख्यअतिथी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी दिली.

सन २०११ पासून दरवर्षी होणारा राज्यस्तरीय माळी समाज मेळावा आता एकप्रकारे परंपरेचा मेळावा होत असून या मेळाव्यासाठी ना. छगनराव भुजबळ, ना. धनंजयराव मुंडे, ना. दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा ना. रुपालीताई चाकणकर, खा. अमोल कोल्हे, माजी आ.अतुल सावे, आ.जयकुमार गोरे, आ.मनीषाताई चौधरी, आ.देवयानीताई फरांदे, आ.प्रज्ञाताई सातव, आ.बबनराव शिंदे, आ.सतिष चव्हाण, माजी आ.अमरसिंह पंडित, आ.संदिप क्षीरसागर, आ.प्रणितीताई शिंदे, आ.यशवंत माने, आ.संजय शिंदे, आ.शहाजी पाटील, रंजनभाऊ गिरमे, नामदेवदेवा राऊत, शंकरराव बोरकर, संभाजीराजे शिंदे आदी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.
तरी राज्यातील माळी समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे अवाहन मेळाव्याचे संयोजक कल्याण आखाडे यांनी केले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!