बीड

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री पवारांना निवेदन


बीड/प्रतिनिधी:

ओबीसी प्रवर्गाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण पुर्ववत करून ओबीसी समाजाला न्याय द्यावा या मागणीचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी गिरवली (ता.भूम) येथे भेट घेऊन दिले.याबाबतीत राज्यातील महाविकास आघाडी सरकार संवेदनशील व सकारात्मक असून लवकरात लवकर कायदेशीर मार्ग काढण्यात येईल अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. याप्रसंगी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आ.सतीश चव्हाण यांच्यासह सावता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते डॉ. राजीव काळे, बीड जिल्हाध्यक्ष किशोर राऊत, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष नितीन शिंदे, सुनील शिंदे उपस्थित होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!