केजक्राईम डायरी

शेजारी स्वयंपाक करण्यासाठी गेलेली २९ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता

गौतम बचुटे/केज :- नात्यातील एकाच्या टिळ्याच्या कार्यक्रमाच्या स्वयंपाकासाठी गेलेली केज तालुक्यातील एका गावातील २९ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. २५ फेब्रुवारी रोजी केज तालुक्यातील एका गावातील एक २९ वर्षीय विवाहित महिला ही तिच्या शेजारी असलेल्या एका टिळ्याच्या कार्यक्रमात स्वयंपाक करण्यासाठी म्हणून  घरातून गेली. तिच्या पतीने रात्री घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहिले. त्याला वाटले की, त्याची पत्नी ही शेजारच्य टिळ्याच्या कार्यक्रमाच्या स्वयंपाकासाठी गेली असावी; म्हणून त्याने पहाटे ५:०० वा. शेजाऱ्याकडे चौकशी केली. मात्र शेजाऱ्यांनी त्याची पत्नी ही स्वयंपाकासाठी आली नसल्याचे सांगीतले. त्या नंतर तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. म्हणून तिचा पती याने दिलेल्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात मिसींग नं. ०५/२०२२ नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अशोक गवळी हे पुढील तपास करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!