केजक्राईम डायरी
फळे विकत घेताना मोबाईल पळवीला

केज /प्रतिनिधी:
फळाच्या गाड्यावर फळे विकत घेत असताना मोबाईल पळविल्याची घटना शहरातील बस स्थानकाच्या समोर सोमवारी ( दि. ७) घडली याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील जयभवानी सोसायटी येथे राहणाऱ्या स्मिता गोरख ओव्हाळ या फळाच्या गाड्यावर फळे विकत घेत असताना त्यांनी त्यांच्या हातातील मोबाइल फळाच्या गाड्यावर ठेवला. फळे गाडीत ठेवून लागलीच मोबाईल फळाच्या गाड्यावर राहिल्याने लक्षात आल्याने फळाच्या गडावर जाऊन मोबाईल पाहिला असता तो गायब झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मपोना पाचपिंडे या करीत आहेत.