केजक्राईम डायरी
भाजी खरेदी करणाऱ्याचा मोबाइल लांबवला

केज/प्रतिनिधी:
शहरातील बाजारात भाजीपाला खरेदी करणाऱ्या तरुणाच्या खिशातून २० हजार रुपयांचा मोबाइल, २ हजार रुपये चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला. साळेगावातील अश्फाक नवाब सय्यद हे शहरातील समता नगर भागात राहत असून ते १५ जून रोजी मंगळवार पेठेतील बाजारात भाजीपाला करत होते. चोरट्याने त्यांच्या खिशातील १९ हजार ९९९ रुपयांचा मोबाइल व मोबाइल कव्हरमध्ये ठेवलेली २ हजाराची नोट, आरसी बुक, लायसन्स, आधार कार्ड लंपास केले. अश्फाक सय्यद यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला.