रोटरी क्लब च्या विभागीय आय.टी. संचालक पदी संतोष मोहिते

अंबाजोगाई/ प्रतिनिधी:
रोटरी क्लब च्या विभागीय आय.टी. संचालक पदी अंबाजोगाई येथील संगणकतज्ञ संतोष मोहिते यांची निवड झाली आहे.
संपूर्ण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्टार्तील सोलापूर, अहमदनगर व सातारा या जिल्ह्यातील 88 क्लब मिळून रोटरी चा ३१३२ हा एक विभाग आहे. संपूर्ण विभागा मधून विविध पदाधिकारी निवडले जातात. या वर्षी संतोष मोहिते यांची आय.टी. च्या विभागीय संचालक पदी निवड झाली आहे. या पूर्वी त्यांनी २०१७ -१८ मध्ये रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी चे अध्यक्ष, २०१८-१९ साली विभागीय संचालक कल्चरल व स्पोर्ट्स, २०१९-२० मध्ये विभाग चेयर आय टी प्रमोशन, २०२०-२१ साली उपप्रांतपाल म्हणून काम केले आहे.
मोहिते यांच्या सोबत या वर्षी क्लब चे प्रवीण चोकडा यांची या वर्षी उपप्रांतपाल म्हणून निवड झाली आहे. असे रोटरी चे प्रांतपाल ओमप्रकाश मोतीपवळे यांनी कळवले आहे.