अंबाजोगाईक्राईम डायरी
लबाडी करून दुचाकी चोरून नेली, एकावर गुन्हा दाखल

अंबाजोगाई: दुचाकी मालकाची सहमती नसताना लबाडी करून दुचाकी चोरून नेल्याची घटना शहरातील दूध डेअरी च्या बाजूस घडली. याप्रकरणी बीड येथील एका वर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील चनई येथील रहिवासी संजय सखाराम चौधरी (वय: ३१) यांना बीड येथील एका व्यक्तीने त्यांची संमती नसतांना लबाडी व अप्रामाणिकपणे त्यांचे दुचाकी (एम एच ४४ आर ४२२६) चोरून नेली. या प्रकरणी संजय चौधरी यांच्या फिर्यादीवरून गणेश मोतीलाल गायकवाड (रा. ग्रामसेवक गल्ली, बीड) याच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक बनसोडे करीत आहेत.