अंबाजोगाईक्राईम डायरी

यशवंतराव चव्हाण चौकातून दुचाकी चोरी

अंबाजोगाई:  शहरातील यशवंतराव चव्हाण चौकातील इंद्रायणी वस्त्र भांडार समोर लावलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि. २० रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

मोरेवाडी येथील कापड दुकानदार बालासाहेब रावण सुरवसे( वय: ३४) यांनी आपली दुचाकी ( एमएच ४४ एफ ५५०५) इंद्रायणी वस्त्र भंडार या दुकानासमोर लावली होती. रात्रीच्या वेळी चोरट्याने तिची हँडल लॉक तोडून चोरून नेली. या प्रकरणी बालासाहेब सुरवसे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस जमादार दहिरे पुढील तपास करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!