परळी

मुलाला वाचण्यासाठी आईने दिली किडनी !

परळी /प्रतिनिधी:
दोन्ही किडन्या निकामी असल्याने आजाराने ग्रस्त असलेल्या आपल्या मुलाला वाचविण्यासाठी परळी शहरातील माणिक नगर येथील शकुंतला श्रीधर बोकन या आईने आपल्या मुलाला एक किडनी देऊन जीवनदान दिले आहे. (Mother donate kidney to son)

परळीतील माणिक नगर येथील रहिवासी स्वानंद श्रीधर बोकन ( वय 29) हे 2016 पासून किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. यासाठी त्यांनी पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेतले परंतु दोन्ही किडन्या निकामी असल्याने डॉक्टरांनी त्यांना किडनीची गरज असल्याचे सांगितले. आपल्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी त्यांची आई शकुंतला श्रीधर बेकन (वय 50) यांनी आपली किडनी देण्याचा निर्णय घेतला. यानंतर औरंगाबाद येथील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया यशस्वी करीत माणिक बोकन यांना एक किडनी बसविण्यात आली. ही गोष्ट पालकमंत्री धनंजय मुंडे यांना माहीत झाल्यानंतर त्यांनी आपल्या नाथ प्रतिष्ठान च्या माध्यमातून दोन लाख रुपयांचा निधी बोकन कुटुंबीयांना यांना दिला. यामुळे या शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च या माध्यमातून करण्यात आला. यापुढे औषध उपचारासाठी लागणारा खर्च करण्याचे आश्‍वासनही पालकमंत्री धरण्याचे मुंडे यांनी बोकन कुटुंबीयांना दिले. किडनी प्लॅनच्या किडनी ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेनंतर सारंग व त्यांची आई शकुंतला यांची प्रकृती सुरळीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!