क्राईम डायरीशिरूर

मुलाने केलेल्या बेदम मारहाणीत आईचा मृत्यू; वडील चिंताजनक

शिरूर जि. बीड ( Beed) : तालुक्यातील घाटशिळ पारगाव येथे एका विकृत प्रवृत्तीच्या मुलाने आपल्या आई-वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याचा घटना शनिवारी ( दि. 19 ) दुपारी घडली होती. बेदम मारहाण करताना चा व्हिडिओ समोर आला आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या आईचा मृत्यू झाला असून वडिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांमध्ये मुलाच्या कृत्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. बाबासाहेब खेडकर असे मारहाण करणार्‍या विकृत मुलाचे नाव आहे तर शिवबाई खेडकर असे मयत आईचे नाव आहे.

बीड जिल्ह्यातील घाटशिळ पारगाव घाटशिळ पारगाव येथील बाबासाहेब खेडकर या विकृत व्यक्तीने आपल्या आई-वडिलांना शनिवारी दुपारी चारच्या दरम्यान काठीने बेदम मारहाण केली. मारण्याची घटना घडत असताना गावातील एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ चित्रित केला आहे. त्यानंतर रविवारी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घाटशिळ पारगावसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेतून बाबासाहेब खेडकर यांचा विकृत पणा चव्हाट्यावर आला आहे. या मारहाण प्रकरणी अद्याप पर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. बाबासाहेब खेडकर हा काठीन आपल्या जन्मदात्या आई वडीलांना बेदम मारहाण करताना चा दृश्य या व्हिडिओमध्ये आहे. यामध्ये बाबासाहेब खेडकर याची आई शिवबाई खेडकर यांचा मृत्यू झाला आहे, तर वडील नगर येथील दवाखान्यात उपचार घेत असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!