क्राईम डायरीवडवणी
साळिंबातून ३ विद्युत पंप लंपास

वडवणी/प्रतिनिधी:
तालुक्यातील सांळींबा शिवारातील शेत विहिरीवर तसेच मामला तलवातील गट नं. १६१ मधील विहिरीवर बसवलेल्या १४ हजार रुपये किमतीचे ३ विद्युत पंप (motor pump Stolen) चोरीला गेले. १२ ते २३ जूनदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी श्रीमंत लक्ष्मण मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन संशयितांवर वडवणी पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक यादव हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.