क्राईम डायरीमाजलगाव
दिंद्रुड येथून विहीरीतील मोटार चोरली

माजलगाव / प्रतिनिधी
शेतातील विहिरीवर असलेली पाण्याची मोटर चोरून नेल्याची घटना तालुक्यातील दिंद्रुड येथील कोथिंबीरवाडी शिवारात रविवार घडली. या प्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिंद्रुड येथील महिला शेतकरी शारदाबाई कारभारी कोथिंबिरे यांच्या शेतातील विहिरीत असलेली ५ एचपी पाण्याची मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध त्यांच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.