क्राईम डायरीबीड

दुकानासमोर लावलेली मोटारसायकल जाळली

बीड/ प्रतिनिधी
किराणा दुकान समोर लावलेली मोटरसायकल अज्ञात व्यक्तीने जाळल्याची घटना तालुक्यातील खांडेपारगाव येथे सोमवारी( दि. ७) घडली.
येथील न. प. कार्यालयात कार्यरत असलेले गोरख रंगनाथ वाघमारे यांनी आपली हिरो कंपनीची मोटार सायकल ( एम. एच. २३ ऐझेेड ५९३१ ही खांडेपारगाव येथील संतोष आमटे यांच्या किराणा दुकाना समोर लावली होती. यावेळी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सदरील मोटरसायकल जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी गोरख वाघमारे यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!