क्राईम डायरीबीड
दुचाकी लंपास

बीड/प्रतिनिधी
शहरातील दत्तनगर भागातील रहिवासी अभिजीत वष्णिूपंत जायभाये यांनी त्यांची दुचाकी (क्र.एमएच २३ एके ०१०१) ही राहत्या घरासमोर उभा केली होती. ती अज्ञात चोरट्याने हॅन्डल लॉक तोडून चोरून नेलीप्ही घटना ९ जून रोजी पाहटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जायभाय यांच्या फर्यिादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना साळवे करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बीड शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तपास होत नसल्याने नागरिकही पोलीस ठाण्यापर्यंत तक्रार देत नाहीत. त्यामुळे दररोज अशा घटनांमध्ये वाढ होत आहे.