क्राईम डायरीबीड

आडस व माजलगाव येथून दुचाकी लंपास

बीड/ प्रतिनिधी:
माजलगाव तालुक्यातील गंगामसला व धारुर तालुक्यातील आडस येथून दोन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या. गंगामसला येथील शेतकरी महेश मधुकर सोळंके यांची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच ४४ आर.०९४२) १६ जूनच्या पहाटे मोगरा फाट्यावरील शेतातील शेडसमोरुन लंपास केली. आडस येथील शेतकरी ओंकार वसंत शेंडगे यांची दहा हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच ४४ एच.६४४०) घरासमोरुन चोरुन नेली. १२ जून रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. धारुर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!