अंबाजोगाईक्राईम डायरी
धाब्या समोरून मोटर सायकल चोरी

अंबाजोगाई/ प्रतिनिधी
रिंगरोड परिसरात असलेल्या सरकार धाब्यासमोर लावलेली मोटर सायकल (Motorcycle Stolen) चोरून नेल्याची घटना दिनांक 19 जून रोजी घडली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध दि. 28 गुन्हा दाखल झाला आहे.
नागझरी परिसरात राहणारे राम धोंडीबा साबणे यांनी आपली पॅशन प्रो मोटरसायकल (एम. एच. 44 जे 78 74) सरकार धाब्यासमोर लावली होती. यावेळी अज्ञात चोरट्यांनी ही मोटर सायकल चोरून नेली. याप्रकरणी राम धोंडीराम साबणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक डाके करीत आहेत.