क्राईम डायरीमाजलगाव

माजलगाव येथून मोटरसायकल चोरी

माजलगाव/प्रतिनिधी
कापसाच्या गोडाऊन समोर लावलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ५ जून रोजी घडली. गाडीचा शोध घेऊनही ती न सापडल्याने अखेर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
माजलगाव तालुक्यातील गांधनपुरा येथील व्यापारी समीर शब्बीर नाईक यांनी आपली मोटरसायकल (एम. एच. 44 व्ही. 3223) ही येथील सोळंके पेट्रोल पंपाजवळ असलेल्या नवीन गणी आत्तार यांच्या कापसाच्या गोडाऊन समोर लावली होती. गाडी लावून दे जवळच्या दुकानात गेले होते. दुकानातून वापस आल्यानंतर त्यांना आपली मोटरसायकल जाग्यावर दिसली नाही. त्यांनी मोटरसायकलची आजूबाजूच्या परिसरात शोधा शोध केली, परंतु ती न सापडल्याने अखेर त्यांनी ८ जून रोजी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!