क्राईम डायरीमाजलगाव

महाविद्यालयासमोरून मोटरसायकल पळवली

माजलगाव/ प्रतिनिधी
येथील एका महाविद्यालयासमोर लावलेले मोटरसायकल हँडल लॉक तोडून चोरून नेल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पाटील गल्ली येथे राहणारी गणेश दगडू होके यांनी आपली हिरो पॅशन प्रो कंपनीचे मोटरसायकल ( एम एच 44 एम 6343) शहरातील सुंदरराव सोळंके महाविद्यालयाच्या समोर लावली होती. काम उरकून आल्यानंतर होके यांना त्यांची मोटर सायकल जाग्यावर दिसली नाही. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक तोटेवाड करीत आहेत

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!