क्राईम डायरीमाजलगाव

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

माजलगाव/ प्रतिनिधी

शहराजवळील सावरगाव परिसरात मंगळवारी रात्री ११ वाजता अज्ञात वाहनाच्या धडकेत गोवर्धन राजाभाऊ पवार(४८) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तालखेड परिसरातील चाहूर तांडा येथील गोवर्धन राजाभाऊ पवार हे मंगळवारी रात्री दुचाकीने ( क्र.एम.एच.४४ एक्स ५५९१ ) माजलगावकडे येत हाेते. त्यांना समोरुन अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात गोवर्धन यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलिस तपास करत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!