अंबाजोगाई

महागाईच्या विरोधात “वंचित बहुजन आघाडी” चे आंदोलन

अंबाजोगाई/प्रतिनिधी:
महाराष्ट्र व केंद्रसरकरच्या वतीने देशातील वाढती महागाई कमी करण्याच्या मागणीसाठी अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साेमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी वंचित चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोविड 19 मुळे देशातील जनजीवन विस्कळीत होऊन राज्यातील हजारो लोक करोना आजाराने मृत्यू मुखी पडले. लाखो लोक बेघर झालेले आहेत व सद्याच्या पुढील काळात लोकांना रोजगार उपलब्ध नाहीत. त्यातच जीवनावश्यक ,गॅस, इंधन, खाद्य तेल, डाळी, वस्तूचा महागाईचा भडका उडू लागलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी वतीने अंबाजोगाई येथे तात्काळ महागाई कमी करून सामान्य लोकांचे जीवन सुरळीत करणावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार संबंध महाराष्ट्र भरातून तसेच अंबाजोगाई येथे दि .21 जून सोमवार रोजी दुपारी 12 वा. उपजिल्हाधिकारी कार्यालय,अंबाजोगाई जिल्हा बीड येथे तीव्र निदर्शन करण्यात आली. यावेळी वंचित चे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे, शहराध्यक्ष अमोल हातागळे , तालुकाध्यक्ष संजय तेलंग आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!