केज

जनकल्याण मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये चर्चा सत्र  संपन्न

गौतम बचुटे/केज :- जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने येथील अदित्य बहुउद्देशिय जनविकास संस्था संचलित जनकल्याण मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नंदकुमार पानसे यांनी कर्करोग विषयी माहिती दिली. तसेच कर्करोगावर उपचार करण्यासाठी आता बाहेर जाण्याची आवश्यकता नाही कारण जिल्ह्यातच उपचार होतील असे सांगितले. या शिबिराला आशा स्वयंसेविका व पत्रकार उपस्थित होते.

४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने केज येथे आदित्य बहुउद्देशीय जनविकास संस्था संचलित जनकल्याण मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कर्करोग आणि त्यावरील उपचार याची माहिती होण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बार्शी येथील नर्गिस दत्त कॕन्सर हॉस्पिटलचे समन्वयक नंदकुमार पानसे, डॉ. जे. एन. सय्यद, धनंजय कुलकर्णी , रामदास तपसे, गौतम बचुटे, शेख मोहसीन, बलभीम बचुटे यांच्यासह आशा स्वयंसेविका व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पानसे म्हणाले की, कर्करोगावर उपचार करण्यासाठी केमोथेरेपी, रेडियेशन थेरेपी यासारखे उपचार करावे लागतात. यासाठी केज आणि परिसरातील गरजू नागरिकांना बार्शी, लातूर, औरंगाबाद, पुणे या ठिकाणी जावे लागते; परंतु आता माजलगाव येथे हे उपचार करण्यात येणार असून तेही अत्यंत कमी दरात करण्यात येणार आहेत. प्रत्येक शनिवारी केज येथे जनकल्याण हॉस्पिटलमध्ये मुंबई व बार्शी येथील तज्ञ डॉ. प्रवीण शमीवाळ हे तपासणी व उपचार करतील. तसेच भविष्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कर्करोग निदान व जनजागृती कार्यक्रम घेण्यात येतील. ग्लोबलजिन कॉर्परेशन मुंबई यांच्या माध्यमातून मधुमेह तपासणी शिबीरे घेण्यात येणार आहेत.  मधुमेहावर व संशोधन कार्यक्रम घेण्यात येईल असे पानसे यांनी सांगितले.

यावेळी नंदकुमार पानसे यांच्या सहकारी गुजर मॕडम, कळंब तालुका आरोग्य अधिकारी डॉ जे एन सय्यद, आदित्य बहुउद्देशिय जनविकास संस्थेचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी, सल्लागार पत्रकार रामदास तपसे, गौतम बचुटे, शेख मोहसीन तसेच आशा स्वयंसेविका आणि मान्यवर उपस्थित होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!