अंबाजोगाईक्राईम डायरी
अंबाजोगाई तालुक्यातील साकुड येथे तरूणाचे प्रेत आढळले

अंबाजोगाई: तालुक्यातील साकुड येथे एका चाळीस वर्षीय तरुणाचे प्रेत आढळून आल्याची घटना बुधवारी ( दि. ९) सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली. दीपक रामकिसन दगडे (वय ४०) रा. टाकळी शिराढोन जि. लातूर असे मयत तरुणाचे नाव आहे.
तालुक्यातील साकुड परिसरात दुर्गंधी येऊ लागल्याने लोकांनी रस्त्याच्या बाजूला बघितले असता त्यांना तरूणाचे प्रेत आढळून आले. ही माहिती ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांना सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात दाखल केला. या मृतदेहावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे दिसून येत होते. यामुळे हा खून असल्याचे जाणवत आहे. या मृत देहाची दुर्गंधी सुटली असून त्याला आळ्या देखी लागला होत्या. यामुळे ही घटना दोन-तीन दिवसांपूर्वी ची असावी असे निदर्शनास येत आहे.