अंबाजोगाई

पं. पुष्पराज कोष्टी यांना पद्मश्री शंकर बापू आपेगावकर पुरस्कार जाहिर

अंबाजोगाई: तपस्वी पखावज साधक पद्मश्री शंकरबापू आपेगावकर यांच्या नावे दिला जाणारा गौरव पुरस्कार यावर्षी प्रख्यात डागर घराण्याचे सुरबहार वादक पं. पुष्पराज कोष्टी (मुंबई) यांना जाहीर झाला आहे. अंबाजोगाई येथे दिनांक 29 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 7.00 वाजता हॉटेल ईट अँड स्टे (बडोदा बँकेच्या वर) येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

पद्मश्री शंकर बापू सांगीतिक गौरव पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. यावेळी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप 15000 रोख रक्कम मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे.तसेच पद्मश्री शंकरबापू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बंकटस्वामी संस्थान आळंदी, पंढरपूर, नेकनुर यांना 50 हजार रुपये देणगीही देण्यात येणार आहे. यावेळी पुष्पराज कोष्टी व त्यांचे सुपुत्र भूषण कोष्टी या पिता-पुत्रांचा युगल सूरबहार वादन कार्यक्रम संपन्न होणार आहे.या कार्यक्रमास पखावज संगत उद्धव आपेगावकर हे करणार आहेत. ज्यांनी कोविड लसीकरणाचे दोन डोस घेतलेले आहेत अशांनाच प्रवेश दिला जाईल. या कार्यक्रमाचा संगीतप्रेमी रसिकांनी शासन नियमांचे पालन करून लाभ घ्यावा, असे आवाहन पद्मश्री शंकरबापू आपेगावकर परिवार आंबेजोगाई यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!