अंबाजोगाईक्राईम डायरी

चनई येथून दुचाकी चोरी

अंबाजोगाई:  शहराच्या जवळच असलेल्या चनई तातालुका. अंबाजोगाई येथून दुचाकी चोरी झाल्याची घटना दि. २२ रोजी पहाटे साडे चारच्या वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

चनई येथील राजाभाऊ लहुराव कदम ( वय: ४०) यांनी आपल्या हिरो होंडा शाइन कंपनीची दुचाकी ( एम एच ४४ आर ९६७९) आपल्या घरासमोर लावले होती. रात्रीच्या वेळी चोरट्यांनी दुचाकीचे हँडल लॉक तोडून चोरून नेली. याप्रकरणी राजाभाऊ कदम यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक चोपणे पुढील तपास करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!