बॉलिवुड गॉसिप
तारक मेहता का उल्टा चश्मा; शोमधील नट्टू काका यांच्यावर पुन्हा कर्करोगावरील उपचार सुरू

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेत नट्टू काकाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते घनश्याम नायक यांच्यावर पुन्हा एकदा कर्करोगावरील उपचार सुरू करण्यात आले आहेत. अलीकडेच झालेल्या संभाषणादरम्यान घनश्याम यांचा मुलगा विकास यांनी सांगितले की, सुमारे तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या गळ्यावर काही डाग आढळले होते. त्यामुळे त्यांच्यावर पुढील उपचार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.