Uncategorizedबीड

बीड तालुक्यात ६८ ठिकाणी बोअरची सोय

बीड/ प्रतिनिधी

आ. संदिप क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून बीड तालुक्यातील ६८ गावांमध्ये नवीन विंधन विहिर (बोअर) घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पाली येथून या कामाचा शुभारंभ आमदार क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलीम व गावातील ज्येष्ठ नागरीकांच्या हस्ते करण्यात आला.

बीड तालुक्यात आमदार संदिप क्षीरसागर यांच्या माध्यमातून अनेक विकास प्रश्न मार्गी लागत आहेत. याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागात पाण्याची सोय व्हावी, यासाठी बोअर घेतले जात आहेत. बीड मतदारसंघातील कुटेवाडी येथील धनगरवस्ती, गायकवाडवस्ती, वरवटी येथील गुजरवस्ती, पाली येथील फुलेनगर, इस्लाम मदरा, चाळकवस्ती, भालदरा राऊतवस्ती, नवलेवस्ती, भोसलेवस्ती, जोगदंडवाडी, कारगुडेवस्ती, मुर्शदपुर येथील जगतापवस्ती, नाळवंडी येथे म्हेत्रेवस्ती, अमराईवस्ती, चौसाळा येथील हनुमान मंदिर, गावठाण, सुलतानपुर रोड, औताडेवस्ती, हिंगणी बु.येथील ज्योतीबा मंदिर, तांदळेवस्ती, मुंडेवस्ती यासह अशा ६८ गावांत बोअर घेतला जात आहे. यामुळे सार्वजनिक स्तरावर जिथे टंचाईची स्थिती आहे तिथे ग्रामस्थांची पाण्याची सोय होणार आहे.
आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते तर माजी आमदार सय्यद सलीम यांच्या उपस्थितीत बोअर घेण्याच्या कामाचे उद‌्घाटन झाले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!