गेवराई
विभागीय शिक्षण सहसंचालकपदी रणजितसिंह निंबाळकर यांची निवड

गेवराई/ प्रतिनिधी:
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील र. भ.अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गेवराई येथील माजी प्राचार्य डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांची महाराष्ट्र शासनाने औरंगाबादच्या विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक पदी नियुक्ती केली आहे. डॉ. रणजितसिंह निंबाळकर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक आहेत. या निवडीबद्दल अट्टल महाविद्यालयाच्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह पंडित, समितीचे सदस्य बब्बु बारुदवाले, दीपक अतकरे, अॅड. हरीशचंद्र पाटील, आनंद सुतार, भगवान मोटे, जालिंदर पिसाळ, प्राचार्य डॉ. रजनी शिखरे, उपप्राचार्य मेजर विजय सांगळे, डॉ. प्रशांत पांगरीकर, प्रबंधक बप्पासाहेब पिंपळे, कार्यालय अधीक्षक भागवत गवंडी यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी प्राचार्य डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांचे अभिनंदन केले आहे.