राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे बीड जिल्हा काँग्रेस कमेटीकडून उत्स्फूर्त स्वागत

बीड/ प्रतिनिधी
राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत हे शुक्रवार,दिनांक ११ जून रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर आले होते.संपूर्ण बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाकडून ना.राऊत यांचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदींकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी ना.राऊत यांनी भेटी दिल्या.अंबाजोगाई शहरात त्यांनी जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन काँग्रेस पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना प्रोत्साहीत केले.यावेळी फटाके फोडून,मिठाई वाटून पक्ष कार्यकर्त्यांमधून काँग्रेस,ना.डॉ.राऊत आणि पापा मोदी जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.निवासस्थानी येताच राजकिशोर मोदींकडून ऊर्जामंञी ना.डाॅ.नितीन राऊत यांचे व त्यांचे सोबत आलेले सहका-यांचे फेटा बांधून,शाल,पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.याप्रसंगी उपस्थित नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी बोलताना ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत म्हणाले की,बीड जिल्ह्यात राजकिशोर मोदींकडून आठरापगड जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष मजबूत व बळकट करण्याचे काम सुरू आहे.बीड जिल्ह्यात वीज ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.वीज बील वसुलीचे प्रमाण चांगले आहे.त्यामुळे पुढील काळात बीड जिल्ह्यातील जनता व विकासासाठी एकूण वसुलीतील ६६ टक्के वाटा देण्यात येईल.ऊर्जा मंत्रालयाकडून अनेक योजना राबवणार आहोत.नवनवीन प्रकल्प,राज्यात उर्जे संदर्भात असलेले अनेक प्रश्न ऊर्जा खात्यांतर्गत सोडविण्यासाठी अनेक योजना आगामी काळात आम्ही घेऊन येत आहोत असेही त्यांनी म्हटले.त्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प प्रमाणेच वेगवेगळे प्रकल्प असतील अशा विविध योजना लवकरच राज्यातील जनतेसाठी राबविण्यात येणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे.तसेच यावेळेस बोलताना वीज बिल माफी बद्दल त्यांनी बोलताना वीज बिलात माफी हि केंद्र आणि राज्य सरकारच्या हातात आहे.त्यावर आम्ही फक्त वीज बिलाचे हप्ते पडून देण्यास सक्षम आहोत बिल माफी आम्ही करू शकत नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले.जनतेसाठी ऊर्जा मंत्रालयाकडून संपूर्ण महाराष्ट्रात कृषी वीज जोडणी उपक्रम राबवत असल्याचीही माहिती डॉ.राऊत यांनी बोलताना दिली.याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदींकडून मागील अनेक वर्षांपासून अंबाजोगाई शहरात काँग्रेसची सत्ता आबाधित असल्याचे सांगत मला पक्षाने वेळोवेळी विविध पदे,मानसन्मान दिले आहेत.आता माझ्या अंबाजोगाईच्या सर्वांगिण विकासाकरीता महाविकास आघाडी सरकारकडून भरीव निधी,विविध विकास योजना द्याव्यात अशी विनंती करण्यात आली.या प्रसंगी महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक व पणन महासंघाचे उपाध्यक्ष अॅड.विष्णुपंत सोळंके,जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पोतंगले,तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे,शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा, नगरसेवक अमोल लोमटे,नगरसेवक सुनिल व्यवहारे, नगरसेवक धम्मपाल सरवदे,नगरसेवक वाजेद खतीब,राणा चव्हाण,सुनिल वाघाळकर,कचरूलाल सारडा,माणिक वडवणकर,सज्जन गाठाळ,गणेश मसने, अशोक देवकर,दिनेश घोडके,गवळी,अकबर पठाण,विजय कोंबडे, सचिन जाधव,सुधाकर टेकाळे,जुनैद सिद्दीकी,प्रताप देवकर,अजीम जरगर,अमोल मिसाळ,आनंद टाकळकर,काझी शाकेरभाई,महेश वेदपाठक आदींसह काँग्रेस पक्ष पदाधिकारी,कार्यकर्ते यांचीही उपस्थिती होती.