अंबाजोगाई

कुंबेफळ येथे शालेय समितीची बिरविरोध निवड

अंबाजोगाई: तालुक्यातील कुंबेफळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीची अध्यक्ष पदी बालासाहेब बोर्डे तर उपाध्यक्षपदी राधा प्रकाश तोडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गावकऱ्यांनी नवनिर्वाचित समितीचा हृदय सत्कार केला आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील मौजे कुंबेफळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळा व्यवस्थापन समितीची मुदत संपल्यामुळे नवीन शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. यावेळी 14 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. विरोधात एकही अर्ज दाखल झाला नसल्याने शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली. यात
शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी बालासाहेब बोर्डे तर उपाध्यक्षपदी राधा प्रकाश तोडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.यावेळी नवनिर्वाचित शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सोमवार दि.31जानेवारी रोजी गावकऱ्यांच्या वतीने हृदय सत्कार करण्यात आला आहे.

गावकऱ्यांच्या वतीने नवनयुक्त सदस्यांच्या सत्कार

बिनविराध निवडून आलेल्या सर्व सदस्यांचा यावेळी गावकऱ्यांच्या वतीने सतकार करण्यात आला. यावेळी दूरदर्शनचे जिल्हा प्रतिनिधी रोहिदास हातागळे, माजी सरपंच शिवाजी डोईफोडे, सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य वसंत शिंपले,सरपंच प्रतिनिधी गणेश भोसले,प्रकाश तोडकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत झिरमाळे, ग्रामपंचायत सदस्य उत्तरेश्वर इंगोले,ग्रामपंचायत सदस्य विष्णू सोनवणे,अनिल शिंदे, महादेव खामकर, हरिनाना तोडकर,माजी उपसरपंच  सुधाकर भोसले,गोपाळ तोडकर,महेंद्र तोडकर, रंजित जोगदंड, वामन तोडकर, महादेव गायकवाड, दयानंद तोडकर, मल्हारी खामकर, उमाकांत झिरमाळे,ओम यादव,अमोल तोडकर,गोपाळ लुगडे, महेश लिंगे, बालासाहेब शिंदे,अशोक सावंत ,भारत हुलगे यांच्यासह आदी गावकऱ्यांची उपस्थिती होती.

 

 

 

 

 

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!