अंबाजोगाई

वंचित बहुजन आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी सुशांत धवारे

अंबाजोगाई: येथील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी सुशांत धावारे यांची बीड जिल्हा पूर्व प्रसिद्धी प्रमुख पदी फेरनिवड करण्यात आली आहे. या निवडीचे नुकतेच त्यांना पत्र देण्यात आले आहे. निवडीबद्दल धावरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर, मराठवाडा अध्यक्ष अशोक भाऊ हिंगे यांनी विश्वास ठेवून सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे, स्वाराती ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या कोणत्याही लोकांना तात्काळ मदत करणारे सुशांत धवारे यांची बीड जिल्हा पूर्वच्या जिल्हाप्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे अनेक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!