अंबाजोगाई

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पॅनलवर ॲड. व्ही.आर.देशमुख यांची निवड

अंबाजोगाई: महाराष्ट्र शासनाच्या मराठवाडा विभागासाठी असलेल्या औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पॅनलवर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे वकील म्हणुन अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील विधिज्ञ तथा माजी सहाय्यक सरकारी वकील ॲड.व्ही.आर.देशमुख यांची निवड महामंडळाकडुन करण्यात आली असून त्यांना नियुक्तीचे पत्र ई-मेल द्वारे मिळाले आहे.

ते महामंडळाच्या विरूद्ध असलेल्या प्रकरणांमध्ये तसेच भूसंपादनाच्या, लवाद व इतर प्रकरणात महामंडळाची कायदेशीर बाजू मांडतील. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे. या निवडीबद्दल बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण, गोविंदभैय्या देशमुख यांचे ॲड. व्ही.आर.देशमुख यांनी आभार मानले आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयातील विधिज्ञ ॲड. प्रदीप देशमुख, ॲड. बी. ए. पुरी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!