क्रीडा

टीकेबाबत कुठलाही आक्षेप नाही – राहणे

साऊदम्प्टन: भारतीय संघाचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणेला दुसऱ्यांनी केलेल्या टीकेबाबत कुठलाही आक्षेप नाही. त्याच्या खेळाबद्दल लाेक काय विचार करतात, याकडे दुर्लक्ष करत तो संघाला कसोटीत विजय मिळवून देण्यासाठी पुढे वाटचाल करतो. गेल्या काही वर्षांत चढ-उतारातील कामगिरी करत १७ सामन्यांत सर्वाधिक १०९५ धावांसह उपकर्णधाराने दोन वर्षांत भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात पोहोचवले.

रहाणेने म्हटले की, ‘सर्वाधिक धावा केल्यावर निश्चित चांगले वाटते. मात्र, खराब कामगिरी केल्यावर जेव्हा टीका होते, त्याचे काय? माझ्यावर टीका झाल्याचा आनंद वाटतो. मला वाटते, टीका झाल्यामुळे आज मी या उंचीपर्यंत पोहोचू शकलो. मी नेहमी आपले १०० टक्के योगदान देऊ इच्छितो. लोक माझ्यावर टीका करो अथवा ना करो. माझ्यासाठी फलंदाजी व क्षेत्ररक्षणात संपूर्ण योगदान देणे महत्त्वाचे आहे.’

आठ वर्षांपेक्षा अधिक काळ कसोटी क्रिकेट खेळल्यानंतर रहाणे जाणतो की, लोकांचा विचार सतत बदलतो. तो म्हणतो, ‘खरे तर मी कुणाच्या टीकेबाबत विचार करत नाही. लोक माझ्यावर टीका करत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे व त्यांचे कामही. आपण त्या गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकत नाही. मी नेहमी स्वत:च्या कामगिरीवर लक्ष देतो, कठोर मेहनत घेतो आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय.’ रहाणे २०१९ मध्ये हॅम्पशायर काउंटीकडून खेळला होता, त्यामुळे त्याला या मैदानावर खेळण्याचा अनुभव आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!