केजक्राईम डायरी

वकीलद्वारे नोटीस का पाठविली ? म्हणून मारहाण

गौतम बचुटे/केज :- मुलीला नांदण्यास येण्यासाठी वकीला मार्फत नोटीस का पाठविली म्हणून एकास मारहाण केल्याची घटना घडली आहे.

या बाबतची माहिती अशी की, साळेगाव ता. केज येथील भारत वैरागे यांच्या मुलगा विकास याचे लग्न पिसेगाव येथील आश्रूबा लांडगे यांची मुलगी रेश्मा हिच्या सोबत एक वर्षा पूर्वी झाले आहे. परंतु त्याची पत्नी एक वर्षां पासून नांदत नाही. ती पिसेगाव येथे माहेरी असते. तिने नांदायला येण्यासाठी वैरागे यांनी तिला वकीला मार्फत नोटीस पाठविली आहे. दरम्यान दि. २३ मार्च रोजी सायंकाळी ४:०० वा. च्या सुमारास भारत वैरागे हे केज बस स्टँड जवळील अमन ट्रॅव्हल्सच्या बुकिंग ऑफिस समोर केळी खरेदी करीत असताना आश्रुबा कोंडीबा लांडगे याने दारु पिऊन आला व म्हणाला की, मुलीच्या लग्नात मी केलेला खर्च परत कर. असे म्हणुन भारत वैरागे यांच्या गालात चापट मारली व शिवीगाळ करुन जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तेथे बाजुला उभे असलेले अनिल महाजन यांनी भांडण सोडविले. या प्रकरणी भारत वैरागे यांच्या फियादी वरून केज पोलीस ठाण्यात आश्रूबा लांडगे याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात भा.दं.वि. ३२३, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे हे करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!