क्राईम डायरीधारुर
खोडस येथे वृद्धास मारहाण

धारूर/ प्रतिनिधी
तालुक्यातील खोडस येथे शेतात मुरूम टाकण्याच्या कारणावरून एका वृद्धास काठीने मारहाण झाल्याची घटना ३१ मे रोजी घडली. याप्रकरणी शनिवारी चौघांवर धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
खोडस तील राहणारे वयोवृद्ध नागरिक गोविंद ग्यानबा काटे (वय 81 ) यांना मुरूम टाकण्याच्या कारणावरून काठीने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात जितेंद्र काटे, मालनबाई काटे, सीमा काटे, प्रकाश काटे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.