पोलिसांना खबर देतो म्हणून केलेल्या मारहाणीत वृद्धाचा उपचारानंतर मृत्यू

आष्टी/प्रतिनिधी:
पोलिसांना खबर का देतो असे म्हणून तीन महिन्यांपूर्वी रात्रीच्या वेळी तिघांनी कोयत्यासह कुऱ्हाडीने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचार घेऊन घरी परतल्यानंतर मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील वाकी येथे घडली आहे. नवनाथ अभिवचन काळे (६०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
वाकीतील नवनाथ काळे हे घराच्या समोरील पडवीत झोपलेले असता त्यांच्या काही नातेवाइकांनी पोलिसांनी आमची खबर का देतो, या कारणावरून कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. यानंतर काळेंना अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले हाेते. आठ दिवस उपचार घेऊन घरी आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.१८) सकाळी घडली. आष्टी पोलिस ठाण्यात नवनाथ काळेंच्या पत्नी ढकुबाई नवनाथ काळेंच्या तक्रारीवरून कुलदीप हनुमंत काळे, नटू मिनीनाथ काळे, गोट्या माहाश्या भोसले यांच्यावर गुन्हा दाखल केला.