केजक्राईम डायरी
वृद्ध महिलेस मारहाण

केज/प्रतिनिधी
बाथरूमवर झाडे पाडून नुकसान का केले, अशी विचारणा करणाऱ्या वृद्ध महिलेस काठी, दगड आणि लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केल्याची घटना केज तालुक्यातील टाकळी येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
टाकळी येथील इंद्राबाई भाऊराव चौरे (६०) या महिलेच्या बाथरूमच्या भिंतीवर सुभाबळ, निलगिरीची झाडे पाडून बाथरूमचे नुकसान केले होते. भरपाईची मागणी केली असता सुरेश प्रभू बारगजे याने काठीने मारून मुका मार दिला. भैया सुरेश बारगजे याने जखमी केले. तर कडाबाई प्रभू बारगजे, मनीषा सुरेश बारगजे या महिलांनी मारहाण केली. इंद्राबाई चौरे यांच्या फिर्यादीवरून सुरेश बारगजे, भैया बारगजे, कडाबाई बारगजे, मनीषा बारगजे या चौघांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.