क्राईम डायरीगेवराई

मुलीच्या आत्महत्येप्रकरणी एकास अटक; दोन फरार

गेवराई / प्रतिनिधी :

तालुक्यातील कोळगाव येथील महाविद्यालयीन युवती शीतल सोमनाथ मदने या मुलीच्या आत्महत्यास (Girl Suicide) जबाबदार असणाऱ्या एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र उर्वरीत आरोपी अद्यापही फरार असून त्यांना अटक करण्याची मागणी मयत मुलीच्या वडीलांनी केली आहे.

कोळगाव येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणारी शितल मदने या मुलीने आबासाहेब मदने, अशोक पांगरे, शहादेव लकडे या तरूणांच्या जाचास कंटाळून दि.४ मे रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी आरोपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून एक महिना लोटला तरीही आरोपी अटक करण्यात आली नव्हती. सदर आरोपी यांना अटक करण्यात यावी म्हणून मुलींच्या आई वडीलांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्याकडे आत्मदहन, उपोषण करण्याचे निवेदन दिले. तसेच फिर्यादी सोमनाथ मदने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले होते. तर चकलांबा पोलीसांकडून दि. १४ जून रोजी आबासाहेब मदने यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यास चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे तर उर्वरित आरोपी अद्यापही फरार आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!