अंबाजोगाईक्राईम डायरी

मुरूम खोदून नाली काढल्याने एकास मारहाण

अंबाजोगाई/ प्रतिनिधी:
तुझ्या मुलाने शेतातील रस्त्यावर टाकलेला मुरूम खोदून नाली का काढली अशी भांडणाची कुरापत काढून महारुद्र धोंडिअप्पा कोठाळे यांना मारहाण केल्याची घटना तालुक्यातील बर्दापूर येथे शनिवारी घडली.

त्यांना शिवीगाळ करून चापटाने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी महारुद्र यांचा मुलगा महेश हा जवळ आला असता त्यालाही गचुरीला धरून शिवीगाळ करत डाव्या हाताच्या पोटरीवर चावा घेवून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महारुद्र धोंडाप्पा कोठाळे यांच्या फिर्यादीवरून संगाप्पा धोंडीराम कोठाळे यांच्याविरुद्ध बर्दापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रोडे करीत आहेत

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!