क्राईम डायरीबीड

लाचखोर रोखपालाला एक दिवसाची कोठडी

बीड/प्रतिनिधी:

लेखापरीक्षण अहवालावर सही करण्यासाठी १५ हजारांच्या लाचेची मागणी करून नंतर ही रक्कम परस्पर धनादेश वठवून घेतल्याने एसीबीने जिल्हा बँकेच्या खालापुरी शाखेचा रोखपाल सुंदर बांगरविरोधात शनिवारी गुन्हा नोंद करून अटक केली होती. रविवारी बांगरला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
सुंदर बांगर बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खालापुरी शाखेचा रोखपाल आहे. शिवाय, जांब येथील सेवा सहकारी सोसायटीचा प्रशासक म्हणूनही त्याच्यावर जबाबदारी आहे. बांगरने एका सहकारी संस्थेचे लेखापरीक्षण केले होते. या परीक्षणाच्या अहवालावर स्वाक्षरी करण्यासाठी त्याने १५ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती. एसीबीने सरकारी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली होती. यात बांगरने १५ हजारांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले होते. सोमवारी पुन्हा त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!