क्राईम डायरीमाजलगाव

टिप्पर- मोटरसायकल अपघातात एक ठार; एक जखमी

माजलगाव/प्रतिनिधी:
भरधाव वेगातील टिप्परने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ( दि.17) रात्री साडे नऊच्या दरम्यान खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग असलेल्या लहाम्हेवाडी फाट्याजवळ घडली.

माजलगाव तालुक्यातील आनंद येथील रहिवासी असलेल्या तुकाराम खंडोबा गायके ( वय 20) व बाबुराव बाळासाहेब गायके (वय 32) हे काही कामानिमित्त नित्रुड या गावी गेले होते. काम उरकून मोटरसायकलवरून (एम एच 12 बीपी एल 4798) रात्री नऊच्या नंतर गावाकडे परत येत होते. यावेळी पंढरपूर खामगाव राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना लहाम्हेवाडी फाट्यावर माजलगावकडून येत असलेल्या वाळू टिप्परने जोराची धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील तुकाराम खंडोबा गायके याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला. तर सोबत असणारा बाबुराव बाळासाहेब गायके हा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान जखमी युवकावर बीड येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!