क्राईम डायरी

जीपच्या धडकेत एक ठार

आष्टी / प्रतिनिधी : आष्टी ते नगर रस्त्यावरुन जार्णाया भरधाव जीपने दुचाकीवरुन जाणाऱ्या वडिल व मुलीला समोरुन धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर त्यांची मुलगी गंभीर (One dead, one injured )जखमी झाली. दि.२६ जून रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
कपील मरदान भोसले (रा.कासारी,ता. आष्टी) असे मयताचे नाव आहे तर त्यांची मुलगी शिवानी कपील भोसले ही जखमी झाली. ते दोघे दुचाकीवरुन क्र. (एम.एच.१६ झेड १२१८) कासारी येथून आष्टीकडे जात होते. यावेळी एका हॉटेलसमोर भरधाव जीपने क्र (एम.एच.१२जी.आर.१२०४) त्यांना समोरुन जोराची धडक दिली. यात कपील भोसले यांचा मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी झाले. या प्रकरणी मयताची पत्नी अर्चना भोसले यांच्या फिर्यादीवरुन अनोळखी जीप चालकावर आष्टी ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

Show More
Back to top button
error: Content is protected !!