क्राईम डायरीबीड

दोन रिक्षाच्या धडकेत एक ठार, एक जखमी

बीड /प्रतिनिधी
दोन रिक्षा ची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात एक जण ठार तर एक जखमी झाल्याची घटना तालुक्यातील घाटसावळी जवळ रविवारी (दि. १३) सायंकाळी घडली. जखमीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आंबेसावळी येथील राहणारे रोहिदास काळे हे आपल्या मुलीला सोडण्यासाठी माजलगाव येथे गेले होते. मूलीला सोडून आपल्या गावी ते अॅटो रिक्षात बसून परत येत होते. यावेळी घाटसावळी जवळ दोन रिक्षांची समोरासमोर धडक झाली. यात रोहिदास काळे ( वय ५३) हे गंभीर रित्या जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला. तर मच्छिंद्र बांडे हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!