क्राईम डायरीगेवराई

पाण्यात स्कॉर्पिओ बुडून एक ठार; एक जखमी

गेवराई,(प्रतिनिधी):-
तलवडा रोडवरील रेवकी फाट्या जवळील जायकवाडी उजव्या कालव्याच्या पाण्यात स्कॉर्पिओ पडुन एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

संगम जळगाव येथील दोघे मित्र स्कॉर्पिआ गाडीने गेवराई शहरात कडे येत होते. शुक्रवारी ( दि. १८ ) रात्री ११ वा दरम्यान गाडी
चालवत असतांना कालव्याच्या कठाड्याचा अंदाज न आल्याने कालव्यात पडली. पाणी आसल्यामुळे गाडी पाण्यात बुडाली यात राजेश रामकिसन जायभाय, (वय: २२ रा. संगम जळगाव) याचा बुडुन मृत्यु झाला. तर सोबत त्याचा मित्र सखाराम नागरे हा गंभीर जखमी झाला. रात्री परिसरातील नागरिकांना घटनेची माहिती झाल्यावर दोघांना पाण्यातन बाहेर काढण्यास यश आले. परंतु राजेश जायभाय याचा मृत्यू झाला. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!