अंबाजोगाई

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात ई कचरा आणि सेंद्रिय कचरा व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

अंबाजोगाई: येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे दिनांक १० फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता ई कचरा आणि सेंद्रिय कचरा व्यवस्थापन या विषयावर आभासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अनिल नरसिंगे, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई यांची उपस्थिती होती. डॉ अनिल नरसिंगे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक कचरा आणि सेंद्रिय कचरा या विषयी सविस्तर माहिती देऊन त्याच्या व्यवस्थापनाविषयी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. आभासी कार्यशाळेत एकूण ६६ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली व चर्चेत सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे आयोजक डॉ अनंत मरकाळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर डॉ. इंद्रजीत भगत (कार्यक्रमाधिकारी राष्ट्रीय सेवा योजना) यांनी या प्रसंगी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!