अंबाजोगाईक्राईम डायरी

सरकारी दवाखान्यात ऑपरेशन थेटर मध्ये महिलेस मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल

अंबाजोगाई: येथील सरकारी दवाखाना येथे ऑपरेशन थेटर मध्ये सहा जणांकडून मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.

पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई शहरातील सरकारी दवाखान्यात बारभाई गल्ली येथे सध्या राहत असलेल्या महिलेला बाळंतपणाचा उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी सिझेरियन ऑपरेशन करणे आवश्यक असल्याने डॉक्टरने सदरील महिलेला भूल दिली होती. यावेळी महिलेने नाम स्मरण केल्याने चार पुरुष आणि  दोन महिला डॉक्टरांनी सदरील महिलेला चापटा मारीत शिविगाळ केली. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादी वरून अनोळखी चार पुरुष व दोन महिला यांच्या विरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात कलम 298, 323, 504, 34 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गिरी करत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!